Bappa… Evda aik na….!!!

With all Ganesha going back to their homes here’s a small request placed!!!

बप्पांचा निरोप घेताना दरवर्षीच डोळे अगदीच पाणावतात, १० दिवस पूर्ण घरात एक वेगळीच ऊर्जा पसरवणारा विघ्नहर्ता लाडका गणेश अखेर चालला आपल्या घरी!!!

बप्पा जाता-जाता तुला एकच मागावसं वाटतं….
तु इथे १० दिवस राहीलास, घरातल्या TV वर लागणारी news ऐकलीस, रोज बाबा पेपर वाचत असतानाही तु तिथेच होता!!! म्हणजे जगातलं वातावरण तुला माहीतच आहे!!

इथे ह्याचा accident, तिथे त्याचा murder, इथे हिंदू आणि मुस्लिम वाद, तिथे त्या दंगली….सगळंच सांगावं असं वाटत नाही कारण तुला माहीत आहेच
एक छोटीशी request, बप्पा आम्ही सगळे ना खुपच tech-savvy, sophisticated आणि अगदीच smart झाले आहोत (मुळात आमचे फोन smart झाले आणि आम्ही extra smart), globalization and असले काय काय भारी झालय पण ह्या सगळ्यात एक गोष्टीचा विसर पडलाय आणि तो म्हणजे “मी माणुस आहे, आणि माणुसकी हा माझा पहिला धर्म आहे”
हिंदू आणि मुस्लिम, Higher आणि lower caste ह्या गुंत्यात एवढे अडकलोय की आम्हाला हेच कळत नाही सगळ्यांचं रक्त लालच आहे, जगायला सगळेच श्वास घेतात, म्हणजे तिथे नाही ना आपण बघत की मी हिंदू आहे तर भगवा श्वास आणि मुस्लिम असेल तर हिरवा श्वास – असं काही नसताच ना!
बाप्पा आम्हा सगळ्या मुलांना ही सद्बुद्धि दे की आम्ही ह्या गोष्टीला समझु आणि माणुसकी हा धर्म पाळु, म्हणजे पुढच्या वर्षी तुझ्या स्वागतासाठी आम्ही सगळेच फक्त मंडप न सजवता आमची मन पण चांगल्यी विचारांनी सजवु!

गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. !!!

Punyacha Bappa Morya

A few snaps of the beautiful Ganeshotsav at Pune

And the most grand….

आमचा लाडका श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती!!!!


गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’ च्या जयघोषात संपूर्ण पुणे 10 दिवस अगदीच रमून जातं.

अजूनतर पुणेकरांचा अस्सल नाद – ढोल-ताशा सुरू व्हायचा आहे!!!

Bappa Morya!!!!!!

Smile and spread smiles

(PC – Sameeksha😘😘)