ती भारी वाली feeling!!!

प्रेम…
असते का ओ खरच ही अशी काहीतरी “feeling”…
म्हणजे… ते वेगळ्याच जगात वावरणं…
छोट्याशा भेटीसाठी तास-तासभर आवरणं….
म्हणजे… अचानकच रोज उमलनारं ते गुलाब…
लाजून जास्तच लाल झाल्यासारखं वाटतं…

तिच्या दबदबलेल्या पायांचा शांत आवाजपण…
काळजाचा ठोका चुकवून जातं…
आणि त्याच्या गाडीचा हॉर्न गर्दीत पण…
अंगावर अगदी काटा आणतं…
चेहऱ्यावर येऊन तिच्या खोडसाळ डोळ्यांना अडोसा घालणारी ती केसांची एक बट…
जेव्हा त्याच्या बोटाने मागे जाते…
तेव्हा तिची लाल होणारी गाल…
आणि त्याचं ते तिला एकटक बघणं…
ह्यालाच म्हणतात का ती वाली feeling…
ती प्रेमाची feeling…
एकट्यातच ते हसणं…
हसुन लाजणं..
लाजुन स्वताच आपला मुख लपवून घेणं…
रात्रीच्या चांडण्याबरोबर गप्पा मारणं…
आणि चांदोबाला “माझा निरोप पोहचव हा” असं अगदी बालिशपणाने ने सांगणं
म्हणजे हेच असतं का प्रेम…
हीच आहे का ती special वाली feeling…
दिलेल्या time मधे अगदी धापा टाकत पळत येणं…
आणि पोहोचलो की शाळेतल्या मुलासारखं हट्ट करणं…
अगं चिडू नको ना… मोजून फक्त १३ मिनिटं late झालोय ना मी…
आणि तिचं नाक मुरडत अगदी रागातल्या प्रेमात पाणी देत म्हणणं “नेहमीचंच आहे हे तुझं…”
म्हणजे हेच का ओ ते…
ज्याला प्रेम असं आपण म्हणतो
जेवण नीट कर… गोळ्या time वर घे… असं निघताना तिचं १० वेळा बजावत सांगणं
तुला बस भेटली की कळव… पोहचली की लगेच msg कर अशी काळजी घेत त्याचं तिला म्हणणं
अनोळखी ते दोन जीव
आकाशात भरारी घेत उडणारी चिमुकली पाखरं…
कधी एक मेकात गुरफटून एकाच घरट्यात राहायला तयार होतात कळतच नाही…
ती निखळ स्वच्छ मैत्री…
कधी प्रेमाचा रूप घेते उमजतच नाही…

आणि अखेर तो तिला विचारतो……
“लग्न करशील का ग माझ्याशी, निभावशील का साथ आयुष्यभर?”
घेशील का अशीच काळजी नेहमी, लावशील का माझा नाव तुझ्या नावा पुढे???
आणि तिच्या लाजुन वाकलेल्या नजरेतून….
तिच्या “इश्श” अश्या शब्दातून….
तिच्या त्या चोरून पाहणाऱ्या नेत्रातून…
येतो तिचा निरागस होकार…
हेच असतं ना प्रेम…
जे मैत्रीला प्रेमाचा आणि प्रेमाला जन्मो जन्मानंतरच्या नात्यात बांधुन टाकतं…
खरंच खुप भारी असते ना ही feeling…

Love is most beautiful feeling…..

You might fall….Get bruised…Get hurt…You might feel broken….But still without love…. Life is incomplete!!!😍😍😍

3 thoughts on “ती भारी वाली feeling!!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s